Self Studies

Marathi Test - 1

Result Self Studies

Marathi Test - 1
  • Score

    -

    out of -
  • Rank

    -

    out of -
TIME Taken - -
Self Studies

SHARING IS CARING

If our Website helped you a little, then kindly spread our voice using Social Networks. Spread our word to your readers, friends, teachers, students & all those close ones who deserve to know what you know now.

Self Studies Self Studies
Weekly Quiz Competition
  • Question 1
    5 / -1
    कंठोष्ठ्य वर्ण म्हणजे काय? 
    Solution
    उत्तर व स्पष्टीकरण – कंठ व ओठ यांच्या सहाययाने उच्चार होणारे वर्ण.
    अनेक वर्णांच्या समुदायाला वर्णमाला म्हणतात. ज्या पद्धतीने हे वर्ण लिहिले जातात त्या पद्धतीस लिपी म्हणतात.  
    कंठोष्ठ्य वर्ण – कंठ व ओठ यांच्या मदतीने उच्चार होणारे वर्ण 
    उदा. ओ, औ.
  • Question 2
    5 / -1
    कंठ तालव्य वर्ण म्हणजे काय? 
    Solution
    उत्तर व स्पष्टीकरण - कंठ व टाळू यांच्या दोहोंच्या सहाय्याने उच्चार होणारे वर्ण. 
    • कंठ तालव्य वर्ण – कंठ व टाळू यांच्या दोहोंच्या सहाय्याने उच्चार होणारे वर्ण. 

             उदा. ए,ऐ.

    • वर्ण : अनेक वर्णांच्या समुदायाला वर्णमाला म्हणतात. ज्या पद्धतीने हे वर्ण लिहिले जातात त्या पद्धतीस लिपी म्हणतात.  

     

  • Question 3
    5 / -1
    विसर्ग हा कोणत्या प्रकारचा वर्ण आहे? 
    Solution

     उत्तर व स्पष्टीकरण - कंठ्य वर्ण 

    • ओष्ठ्य वर्ण – ओठांच्या सहाय्याने उच्चार होणारे वर्ण. 
    • ओष्ठ्य म्हणजे ओठ. 
    • खालच्या व वरच्या ओठांचा उपयोग करुन जे वर्ण आपण उच्चारतो त्यांना ‘ओष्ठ्य वर्ण’ असे म्हणतात. 
    • उ, ऊ हे स्वर आणि प, फ, ब, भ, म हे ओष्ठ्य वर्ण आहेत. 
    • कंठ्य वर्ण – कंठ व टाळू यांच्या दोहोंच्या सहाययाने उच्चार होणारे वर्ण. 
    • कंठ म्हणजे गळा.
    • दंततालव्य वर्ण – दात व टाळू यांच्या मदतीने यांच्या मदतीने उच्चार होणारे वर्ग़ कधी कधी च, छ, ज, झ.

     

  • Question 4
    5 / -1
    खालीपैकी मूर्धन्य वर्ण कोणती आहेत?
    Solution
    मूर्धन्य वर्ण: कठोर तालू व कोमल तालू यांच्या मधल्या भागाला मूर्धा असे म्हणतात. जे वर्ण उच्चारताना आपल्या जिभेचा शेंडा या मूर्धेला जाऊन भिडतो, त्यांना मूर्धन्य वर्ण असे म्हणतात.
    • ऋ हा स्वर आणि ट, ठ, ड, ढ, ण, र, ष, क यांना मूर्धन्य वर्ण असे म्हणतात.
    • इ, ई हे स्वर तालव्य वर्ण आहेत.
    • प्, फ् हे ओष्ठ्य वर्ण आहेत.
    • ल्, स् हे दन्त्य वर्ण आहेत.
    अशाप्रकारे वरील पर्यायांपैकी ऋ, र् ही मूर्धन्य वर्ण आहेत.
  • Question 5
    5 / -1
    मृदू असलेले व्यंजन सांगा.
    Solution
    उत्तर व स्पष्टीकरण –
    • ज्या वर्णांचा उच्चार स्पष्ट्पणे होण्यासाठी स्वरांची गरज भासते, त्या वर्णाना व्यंजने म्हणतात. 
    • व्यंजने
    • क वर्ग – क, ख, ग, घ, ङ्
    • च वर्ग - च, छ, ज, झ, ञ्
    • ट वर्ग – ट, ठ, ड, ढ, ण 
    • त वर्ग – त, थ, द, ध, न
    • प वर्ग – प, फ, ब, भ, म
    • प्रत्येक वर्गातील पहिल्या दोन व्यंजनांना कठोर, शेवटच्या व्यंजनाला अनुनासिक व बाकीच्या व्यंजनांना मृदू म्हणतात. य,र,ल,व यांना अर्धस्वर, श,ष,स यांना घर्षक व ह ला महाप्राण व्यंजने म्हणतात. ळ हे स्वतंत्र व्यंजन आहे. 
  • Question 6
    5 / -1
    ख, घ्, छ्, ठ, ढ ह्या व्यंजनांना कोणते व्यंजन म्हणतात? 
    Solution

    स्पष्टीकरण: ख, घ्, छ्, ठ, ढ ह्या व्यंजनांना महाप्राण असे म्हणतात.

     

    महाप्राण:

    ‘ह' या वर्णाचा उच्चार करतांना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते, म्हणून त्याला महाप्राण असे म्हणतात. 

     ख, घ्, छ्, ठ, ढ ही महाप्राण व्यंजने आहेत. क् + ह् = ख, ग् + ह् = घ, अशी ‘ह' च्या उच्चाराची छटा असलेली व्यंजने ‘महाप्राण' म्हणून ओळखली जातात. इंग्रजीमध्ये देखील अशा वर्णांचे स्पेलिंग करतांना त्यात ‘h’ येतो.

    उदाहरणार्थ,

    क-  k : ख- kh ; ग- g :घ- gh

     

    Key Points

    मराठी वर्णमाला:  मराठी वर्णमालेत एकूण ४८ वर्ण आहेत. त्या वर्णांचे ही प्रकार पडतात. ते दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे स्वरांचे प्रकार व दुसरे म्हणजे व्यंजनांचे प्रकार.

     

    व्यंजनांचे प्रकार-स्पर्श व्यंजने, अनुनासिक, कठोर व मृदू व्यंजने, अर्धस्वर, उष्मे- घर्षक व महाप्राण आणि अल्पप्राण व्यंजने असे हे व्यंजनांचे प्रकार आहेत. 

     

    Additional Information 

    श्, ष्, स्, ह् यांचा उच्चार ही वायूच्या घर्षणाने होतो, म्हणून त्यांना ही महाप्राण वर्ण असे म्हणतात. अशा रीतीने मराठी वर्णमालेतील १४ वर्ण हे महाप्राण मानले जातात.

  • Question 7
    5 / -1
    दन्त्य वर्ण म्हणजे काय? 
    Solution
    उत्तर व स्पष्टीकरण - दातांच्या स्पर्शाने उच्चार होणारे वर्ण 
    उदा. लृ, त, थ, द, ध, न, ल, स.
    वर्ण : अनेक वर्णांच्या समुदायाला वर्णमाला म्हणतात. ज्या पद्धतीने हे वर्ण लिहिले जातात त्या पद्धतीस लिपी म्हणतात. 
  • Question 8
    5 / -1
    ज्या वर्णाचा उच्चार कंठातील कोणत्याही अवयवाचे सहाय्य न घेता होतो, त्या वर्णांना _____ असे म्हणतात.
    Solution

    उत्तर: स्वर

    स्पष्टीकरण: 

    1) स्वर: ज्या वर्णाचा उच्चार कंठातील कोणत्याही अवयवाचे सहाय्य न घेता होतो, त्या वर्णांना 'स्वर' असे म्हणतात.

    मराठी भाषेत अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लू, ए, ऐ, ओ, औ असे एकूण बारा स्वर आहेत.

    वरील स्वरांचे एकूण तीन प्रकार पडतात.

    अ) र्‍हस्व स्वर,

    ब) दीर्घ स्वर,

    क) संयुक्त स्वर

    2) स्वरादी: ज्याचा उच्चार करण्याआधी स्वर येतो त्यांना स्वरादी असे म्हणतात.

    स्वर + आदी – स्वरादी

    दोन स्वरादी – अं, अः

    स्वरादी मध्ये अनुस्वार व विसर्ग यांचा समावेश होतो.

    दोन नवे स्वरदी : ओ, औ हे नवे स्वरादी इंग्लिश भाषेतून आलेले आहेत.

    उदा. बॅट, बॉल

    स्वरादीचे एकूण तीन भाग पडतात: अनुस्वार, अनुनासिक, विसर्ग

    3) अनुस्वार: स्वरावर किंवा अक्षरावर मागाहून स्वार होणारा वर्ण किंवा स्वरानंतर होणारा उच्चार म्हणजे अनुस्वार होय. जेव्हा हा उच्चार स्पष्ट व खणखणीत होतो तेव्हा त्याला अनुस्वार असे म्हणतात.

    उदा. गंगा, चंचल इत्यादी.

    4) व्यंजन: ज्याचा उच्चार करतांना जिभेचा कंठ, टाळू, मुर्धा, दात, ओठ, या अवयवांशी स्पर्श होतो त्यांना व्यंजन असे म्हणतात.

    एकुण ३४ व्यंजने आहेत.

    व्यंजनाचे पाच प्रकारात वर्णन केले जाते.

    स्पर्श व्यंजन (25)

    अर्धस्वर व्यंजन (4)

    उष्मा, घर्षक व्यंजन (3)

    महाप्राण व्यंजन (1)

    स्वतंत्र व्यंजन (1)

  • Question 9
    5 / -1
    कोणत्या दोन वर्णाना स्वरादी म्हणतात?
    Solution
    उत्तर व स्पष्टीकरण - अनुस्वार व विसर्ग 
    • अं, अ: या दोन वर्णाना स्वरादी म्हणतात. अं, हा अनुस्वार युक्त स्वर आहे. अनुस्वाराचा उच्चार स्पष्ट होण्यासाठी आधी स्वर यावा लागतो तसेच विसर्गाचे आहे.
    • एखाद्या वर्गापुढे ( : ) अशी दोन टिंबे देऊन ह प्रमाणे उच्चार केला जातो म्हणून अनुस्वार ( ÷ ) व विसर्ग ( : ) या दोन वर्णाना स्वरादी म्हणतात. 
    • अनेक वर्णांच्या समुदायाला वर्णमाला म्हणतात.
    • ज्या पद्धतीने हे वर्ण लिहिले जातात त्या पद्धतीस लिपी म्हणतात.  
  • Question 10
    5 / -1
    कोणते व्यंजन कंठ्य वर्ण प्रकारात मोडत नाही?
    Solution

    योग्य उत्तर च् आहे.

    • जिभेचा मागील भाग हा वर उचलून पडजिभेच्या पुढील भागाला म्हणजेच कंठाला स्पर्श करतांना ज्या वर्णाचा उच्चार होतो, त्यांना 'कंठ्य वर्ण' म्हणतात.
    • अ, आ हे स्वर आणि क् , ख् , ग् , घ् , ‌‌‍‍ङ् , ह् ही व्यंजने कंठ्य वर्ण आहेत.
Self Studies
User
Question Analysis
  • Correct -

  • Wrong -

  • Skipped -

My Perfomance
  • Score

    -

    out of -
  • Rank

    -

    out of -
Re-Attempt Weekly Quiz Competition
Self Studies Get latest Exam Updates
& Study Material Alerts!
No, Thanks
Self Studies
Click on Allow to receive notifications
Allow Notification
Self Studies
Self Studies Self Studies
To enable notifications follow this 2 steps:
  • First Click on Secure Icon Self Studies
  • Second click on the toggle icon
Allow Notification
Get latest Exam Updates & FREE Study Material Alerts!
Self Studies ×
Open Now